Skip to content
Home » Health Tips/आरोग्य टिप्स #motivation #ai

Health Tips/आरोग्य टिप्स #motivation #ai

  • by


HDFC Scholarship २०२३ : पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ७५ हजार रुपये स्कॉलरशिप, त्यासाठी असा करा अर्ज
HDFC Scholarship २०२३ : विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची खास योजना आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्तीची योजना HDFC बँक राबवत आहे. एचडीएफसी बॅंक ECSS परिवर्तनचा २०२३-२४ हा कार्यक्रम राबवत आहे.

या शिष्यवृत्तीचा उद्देश असा आहे की, अनेक मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. पैशाअभावी अनेकांना शिक्षण पूर्ण करता येत नाही. या शिष्यवृत्तीच्या आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे, असा या शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश आहे. चला तर या शिष्यवृत्ती योजनेची पात्रता तसेच अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया

HDFC Scholarship किती स्कॉलरशिप मिळणार?

इयत्ता पहिली ते सहावी साठी – १५ हजार रुपये
इयत्ता सातवी ते बारावी, डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी – १८ हजार रुपये
सामान्य पदवी अभ्यासक्रमांसाठी – ३० हजार रुपये
सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी – ३५ हजार रुपये
व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी – ७५ हजार रुपये

hdfc scholarship scheme शिष्यवृत्तीची पात्रता

विद्यार्थी सध्या इयत्ता पहीली ते बारावी, पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा, ITI, किंवा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश असणं गरजेचं आहे.
अर्जदाराने मागील वर्षी ५५टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

तुमचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) मतदार ओळखपत्र
3) ड्रायव्हिंग लायसन्स
4) बॅंक पासबुक
5) उत्पन्नाचा दाखला
6) पासपोर्ट फोटो
7) प्रतिज्ञापत्र
8) कौटुंबिक/वैयक्तिक संकटाचा पुरावा
9) चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/ प्रवेश पत्र/ संस्थेचे ओळखपत्र/ बोनाफाईड प्रमाणपत्र)

Thanks for Watching
अशाच प्रकारच्या माहिती आपणास वेळोवेळी भेटतील तसेच पूर्ण फॉर्म कसा भरावा ही देखील आपण व्हिडिओ च्या माध्यमातून चालू करणार आहोत, म्हणून @swamirajinfotech9764 सबस्क्राईब करून ठेवा

Join the conversation

Your email address will not be published. Required fields are marked *